न्यू इंग्लिश स्कूल मध्ये प्लास्टिक संकलन साठी अभिनव उपक्रम

1 min read

शिरोली बोरी दि.७:- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश स्कूल शिरोली बोरी (ता.जुन्नर) या शाळेत विद्यार्थ्यांकडून आपल्या परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून प्लास्टिक संकलन केले जात आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेमार्फत हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी हाती घेण्यात आलेला आहे. संकलित करण्यात आलेला प्लास्टिक कचरा हा पुनर्वापरासाठी यावर विशेष काम करणाऱ्या संस्थेकडे जमा करण्यात येणार आहे.या उपक्रमात PDEA च्या या संस्थेच्या सर्व शाळा सहभागी असून विद्यार्थी यामध्ये स्वयंस्फूर्तीने व हिरीरीने भाग घेत आहेत.विद्यार्थ्यांना पालकांना हा प्लास्टिक कचरा पर्यावरणासाठी व सजीवांसाठी किती घातक आहे या मार्फत याचे प्रबोधन केले जात आहे. न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बोरी शाखेचे प्रभारी मुख्याध्यापक योगेश शेळके यांच्याकडून विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक संकलन करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक सोनचाफ्याचे झाड भेट दिले आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी दुहेरी फायदा होत आहे. विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक कचरा संकलन तर होतच आहे. पण त्याचबरोबरीने पर्यावरणासाठी व पक्षी, मधमाशी यांच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड असे दोन्ही सामाजिक जबाबदारी पार पाडल्या जात आहेत. त्यामुळे शिरोली बोरी या शाळेत राबविण्यात येणारा हा उपक्रम नकीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरणार आहे.

तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रशांत गायकवाड, उषा भारती, मयूर कसाळ व राजश्री आहेर यांनीही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!