निमगाव सावात बिबट्याचे सतत दर्शन
1 min read
निमगाव सावा दि.६:- जुन्नर तालुक्यात बिबट्या म्हणजे रोजचाच एक भाग झाला आहे.बिबट्यांकडून शेळ्या मेंढ्यांवर हल्ले होत असतानाच आता मानवी जीवन देखील असुरक्षित वाटू लागले आहे.जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील (घोडेमळा) परिसरात रविवारी दि.५ रोजी रात्री ८ च्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती वातावरण निर्माण झाली आहे.येथील घोडेमळा परिसरात रात्रीच्या वेळी शेतकऱ्याच्या शेतात दबा धरून बसलेला बिबट्या दिसला आणि काळजाचा थरकाप उडाला.स्थानिक ग्रामस्थांनी वनविभगाने या परिसरात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.यापूर्वीही या भागात बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाले असून
बिबट्याच्या हल्ल्यात पशुधनाचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.आमच्या भागात बिबट्याचे प्रमाण वाढत चाललंय.रात्रंदिवस बिबट्याच्या भीतीखाली वावरतोय. वनविभागाने ठोस पावलं उचलून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावचे सरपंच किशोर घोडे, सुनील गहिने व ग्रामस्थांनी केले आहे.