उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांच्या भावावर जीवघेणा हल्ला
1 min read
सोलापूर दि.५:- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे माजी ओएसडी मंगेश चिवटे यांचे बंधू महेश चिवटे यांच्यावर हल्ला करण्यात आला. सकाळी आपल्या शेतात महेश चिवटे एकटे गेले होते.
ते परत येत असताना त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शिवसेना नेते महेश चिवटे जखमी झाले आहेत. महेश चिवटे यांच्यावर हल्ला महेश चिवटे हे शिवसेना जिल्हाप्रमुख आहेत. महेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे माजी स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून मैदानात उतरण्याची तयारी केली होती. काल सकाळी महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर चिवटे यांनी दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांच्यांवर गंभीर आरोप केला आहे.
त्यांनीच सुपारी देऊन हा हल्ला केल्याचा आरोप चिवटे यांनी केला. दिग्विजय बागल हे माजी दिवंगत मंत्री दिगंबर बागल यांचे पुत्र आहेत. महेश चिवटे सकाळी आपल्या शेतात गेले होते. यावेळी त्यांची गाडी अडवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
महेश चिवटे यांच्यावर उपचार सुरु हल्ला झाल्यानंतर करमाळ्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. महेश चिवटे हे मंगेश चिवटे यांचे मोठे बंधू आहेत. मंगेश चिवटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
महेश चिवटे यांनी काय म्हटलं आहे?
चिवटे यांनी ज्यांच्यावर आरोप केला,ते रश्मी आणि दिग्विजय बागल सध्या आहेत शिवसेना शिंदे गटात आहेत. यांनीच कथितपणे चिवटे यांच्यावर हल्ला केल्याने शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर आली आहे. काही दिवसापूर्वी धमकी दिल्याप्रकरणी दिग्विजय बागल यांच्या विरोधात महेश चिवटे यांनी पोलीस तक्रार दिली होती.
महेश चिवटे म्हणाले, “मकाई कारखान्याच्या सर्वेसर्वा रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांच्याकडून सुपारी घेऊन मनोज लांडगे नावाच्या तरुणाने माझ्यावर हल्ला केला.त्याने माझी गाडी अडवून बेदम मारहाण केली. लाठी काठीने मारहाण केली. त्यावेळी मी एकटाच होतो. मी शेतात येत होतो. मला जीवे मारण्याचा त्याचा प्रयत्न होता.
मी आता पोलिसांना फोन केला आहे. मी आता रश्मी बागल आणि दिग्विजय बागल तुला सांगतो, तू जर सुपारी देऊन अशाप्रकारे माणसं माझ्या अंगावर सोडत असशील, तर जशास तसं उत्तर यापुढे दिलं जाईल, हे लक्षात ठेव. तुलाही तुझा भाऊ आहे, हे ध्यानात ठेव.”
