महाराष्ट्रात आता दुकानं व हॉटेल्स २४ तास खुले…पण…
1 min read
मुंबई दि.२:- राज्यातील सर्व दुकाने आता २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व दुकानं, हॉटेल्स आणि इतर अस्थापना २४ तास उघडी ठेवता येणार आहेत. मात्र काही दुकानांसाठी हा नियम लागू नसेल.मद्यपान गृहे, बार परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार हे २४ तास सुरू राहणार नाहीत. तर इतर सर्व आस्थापना, खाद्यगृहं, आणि दुकाने आता 24 तास सुरू राहतील. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम २०१७ हा अधिनियम सर्व दुकाने, निवासी हॉटेल, उपाहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर्स, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा येतील नोकरीला राहणारे.
कर्मचाऱ्यांच्या इतर सेवांतील नियमन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा बाबींकरीता तरतूद करण्यासाठी महाराष्ट्रात हा नियम लागू करण्यात आला आहे.महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकर्यांचे व सेवासंबंधी नियमन) अधिनियम, २०१७ च्या कलम २१(२) मध्ये “दिवस” अशी व्याख्या, मध्यरात्रीपासून सुरू होणारा २४ तासांचा कालावधी, अशी नमूद करण्यात आलीय.
अधिनियमाच्या कलम १६ (१) (ख) मध्ये आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस धंदा करण्यास खुल्या ठेवता येणार आहेत.मात्र तरीही प्रत्येक कर्मचाऱ्यास आठवड्यातून २४ तास सलग विश्रांती मिळेल, साप्ताहिक सुट्टी देण्यात येईल, अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकार दुकाने आणि आस्थापना (नोकर्यांचे व सेवासंबंधी नियमन) अधिनियम, २०१७ मधील कलम ११ अन्तर्गत एखाद्या क्षेत्रासाठी किंवा निरनिराळ्या क्षेत्रांसाठी आणि निरनिराळ्या कालावधीसाठी, निरनिराळ्या प्रकारच्या आस्थापनांच्या वर्गांच्या परिसरात व्यापारी संकुल किंवा मॉल यांच्यासाठी सुरू आणि बंद करण्याच्या
वेळा निश्चित करण्याचे अधिकार राज्य शासनास प्रदान करण्यात आलेले आहेत. या अधिनियमान्वये शासनाने २०१७ रोजी काढलेल्या अधिसूचनाद्वारे राज्यातील विविध क्षेत्रांतील परमिट रूम, बार, डान्सबार, हुक्का बार, डिस्कोथेक आणि अशा प्रकारच्या सर्व आस्थापना जेथे कोणत्याही प्रकारचे मद्यविक्री केली जाते.
तसेच वाईन आणि बीअर अशा प्रकारचे मद्यविक्री करणारी दुकाने, थिएटर्स आणि सिनेमागृह अथवा चित्रपटगृह या आस्थापनांसाठी सुरू व बंद करण्याचे वेळापत्रक निर्धारित करण्यात आली आहेत.