मोबाईलचा अतिवापर घातक:- महादेव शेलार
1 min read
आणे दि.२:- विद्यार्थांना मोबाईलचा अतिवापर घातक असून विद्यार्थांनी मोबाईलचा अतिवापर करू नये. तसेच शाळेतील मुलांचे अभ्यास सोडून बैलगाडा घाटात जाऊन बसणे व मोबाईलचा अतिवापर करणे यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. असे नारायणगाव चे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार
यांनी पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्या वेळी सांगितले.पारगाव येथील इंदिरानगरमधील इयत्ता पहिली ते दहावी मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार हे होते.
तसेच निमगावसावा बिट अंमलदार संतोष कोकणे, पोलीस पाटील हेमंत चव्हाण, उद्योजक संभाजी चव्हाण, पारगावचे सरपंच रेश्मा बोटकर, उपसरपंच रामचंद्र डुकरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबाजी डुकरे, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रघुनाथ तट्टू, महात्मा गांधी हायस्कुल शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शंकर भोर,
सोसायटीचे चेअरमन नितीन चव्हाण, माजी उपसरपंच रामदास तट्टू, व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ तुकाराम चव्हाण, माऊली चव्हाण, राजू तट्टू, दिलीप गिरी, रवी कुटे, फकीरा पाबळे तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थीत होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष सचिन डुकरे व आभार प्रदर्शन सुभाष चव्हाण यांनी केले.
