विद्या निकेतनमध्ये महात्मा गांधी जयंती निमित्त प्रतिमा पूजन व विचारांचे स्मरण
1 min read
बोटा दि.१:- विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय, बोटा (ता.संगमनेर) येथे खंडे नवमी, दांडिया उत्सव, तसेच महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सेक्रेटरी रामदास
पोखरकर,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विद्युलता पाटील, संस्थेचे सल्लागार डॉ. बी.पाटील, प्राचार्य डॉ.पी.ए.फटांगरे तसेच सर्व विभागांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व त्यांच्या विचारांचे स्मरण करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. खंडे नवमीच्या निमित्ताने पारंपरिक वाद्यांच्या गजरात पूजा व आरती झाली. दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते,
ज्यात विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गानेही उत्साहाने सहभाग घेतला. रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखात सजलेले विद्यार्थी आणि संगीताच्या तालावर थिरकणारे पाय, संपूर्ण परिसरात आनंदमयी वातावरण निर्माण करत होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे सेक्रेटरी आणि प्राचार्य यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थीांचे अभिनंदन केले आणि पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

