केडगावमध्ये बर्निंग कारचा थरार ; झेंडा चौकात घडली घटना
1 min read
अहिल्यानगर दि.२७:- केडगाव येथील झेंडा चौकातील एका मॉल समोर उभ्या असलेल्या कारला काल (ता. २६) रात्री अचानक आग लागली. त्यामुळे एकच धांदल उडाली. या घटनेनंतर अहिल्यानगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. मात्र आगीत वाहनाचे मोठे नुकसान झाले असून जीवितहानी टळली आहे.
केडगाव येथील झेंडा चौकात असलेल्या एका मॉल समोर उभी असलेली गणेश भालसिंग यांची सीएनजी कारने रात्री १२ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. त्यामुळे गजबजलेल्या चौकात एकच धांदल उडाली. घटनास्थळी नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही.
या घटनांची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाला दिली. अग्निशमन विभागाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. यावेळी अग्निशमन विभागाचे वाहन चालक संकेत साठे, फायरमन अविनाश साठे, सुरेश बडे, धीरज जावळे यांच्या पथकाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
