राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्षपदी रोहित नरवडे यांची निवड

1 min read

जुन्नर दि.२६:- जाधववाडी (ता.जुन्नर) येथील रोहित नरवडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. नारायणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाची आढावा बैठक पार पडली.या वेळी ही निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला युवा नेते योगेंद्र पवार, जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष अनंत चौगुले, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, तालुका अध्यक्ष तुषार थोरात, अजित लेंडे, चंदा गाडगे, सोनाल शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. योगेंद्र पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन रोहित नरवडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस युवक शरद पवार या पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुढील स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका यांना लक्षात घेता पक्षामध्ये मोठे बदल व हालचाली दिसून आल्या. बूथ लेवल एजंट नेमून त्यांकडून कालावधीमध्ये बोगस वाढलेलं मतदान मतदार यादीतून तपासून पुढे कळवणे यावर प्रक्रिया होणे तसेच तालुक्यातील विविध प्रश्न बिबट्याचा प्रश्न यावर युवक संघटना जन आंदोलन करणार असल्याचं नरवडे यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!