आई तुळजाभवानी मातेची मानाची ऐतिहासिक पालखी पाथर्डीत
1 min read
पाथर्डी दि.२५:- अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मानाची ऐतिहासिक पालखी पाथर्डी शहरात आज सायंकाळी दाखल होणार आहे. हजारो भाविकांच्या उपस्थिती मध्ये शहरातून भव्य दिव्य, नेत्रदीपक असा सोहळा रंगणार आहे. या प्रसंगी भाविकांनी पालखी आईच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पालखी उत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
