घराबाहेर बसून अभ्यास करताना बिबट्याची झडप; बिबट्याच्या हल्यात चिमुकला ठार
1 min read
कुमशेत दि.२५:- कुमशेत (ता.जुन्नर) येथे सिद्धार्थ प्रवीण केदार (वय ७) या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. असून तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी वनविभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सिद्धार्थ हा घराच्या बाहेर बसून अभ्यास करत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घेतली आणि त्याला उचलून घेऊन गेला. आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला, परंतु बिबट्या सिद्धार्थला घेऊन पसार झाला. आई घरात स्वयंपाक करत होती. घराशेजारीच असलेल्या छप्परामध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या,
शिकार करण्यासाठी दबा धरून बसलेला बिबट्या त्याठिकाणी आला व त्याने अंगणात बसलेल्या सिद्धार्थला १५० ते २०० फुट फरपटत ओढत ऊसाच्या शेताकडे नेले.
ग्रामस्थांनी तातडीने शोधकार्य सुरू केले असता, जवळच्या शेतात सिद्धार्थचा मृतदेह आढळून आला. त्यांनी शोध घेतला असता त्यांना फरपट असलेल्या जागेवर सिद्धार्थच्या हातातून पडलेला
पेन व काही अंतरावर रक्त सांडल्याचे आढळून आले. नागरिकांनी कसून शोध घेतला असता जवळच असलेल्या ऊसाच्या शेतात काही प्रमाणात खालेल्या आवस्थेत सिद्धार्थचा मृतदेह आढळून आला.घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
