वळसे पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना युवा सप्ताह ला सुरुवात
1 min read
निमगाव सावा दि.२४:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचालित, दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना दिवस दि.24 या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये दिनांक 22 सप्टेंबर 2025 ते 29 सप्टेंबर 2025 हा आठवडा राष्ट्रीय सेवा योजना युवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे.
या सप्ताहाची सुरुवात सोमवार दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदान स्मरण करून संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांच्या हस्ते महाविद्यालयातील विद्यार्थी प्रिय प्राध्यापकाची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रा.मनीष राहताडे यांना हा बहुमान मिळाला.
31 ऑक्टोबर रोजी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचे 150 वी जयंती निमित्त महाविद्यालयामध्ये सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या ऑपरेशन पोलो या कार्याबद्दल प्रा.ज्योती गायकवाड यांनी त्यांच्या जीवन व कार्य विषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागण्यासाठी ऑपरेशन सिंदूर याबाबत विद्यार्थ्यांना चित्रफित दाखवण्यात आली.
प्रा.सुभाष घोडे यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.ज्योती गायकवाड यांनी 24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना दिवस म्हणून साजरा करण्याचे आयोजन, 25 सप्टेंबर 2025 रोजी पंडित दीनदयाळ यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन,
26 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिवसानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन, 27 सप्टेंबर 2025 रोजी विश्व पर्यटन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानमाला चे आयोजन,
28 सप्टेंबर 2025 रोजी शहीद भगतसिंग जयंती निमित्त त्यांनी केलेल्या कार्याबाबत युवकांमध्ये देशभक्ती, साहस व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन, 29 सप्टेंबर 2025 रोजी विश्व हृदय दिवसानिमित्त कार्यशाळा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नीलम गायकवाड यांनी केले तर आभार प्रा.माधुरी भोर यांनी व्यक्त केले.
