पाकिस्तानी सैन्याच्या समर्थनाचा व्हिडिओ स्टेटस ठेवल्याने गुन्हा दाखल; नागरिकांच्या संतप्त भावना

1 min read

नेवासा दि.२३:-जळका खुर्द (ता.नेवासा) येथे पाकिस्तानी सैन्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर व्हिडिओ स्टेटस ठेवल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल अरविंद सुरेश वैद्य यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की, रसूल उर्फ गबु यासीन पठाण (रा. जळका खुर्द, ता. नेवासा) याने त्याच्या व्हॉट्स अॅपवर पाकिस्तानी सैन्याच्या समर्थनाचा १३ सेकंदांचा व्हिडिओ स्टेटस ठेवला होता. गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोकांनी हा स्टेटस पाहिल्याने त्यांच्या भावना संतप्त झाल्या.या व्हिडिओमध्ये एक महिला ‘पाकिस्तान’ लिहिलेला पांढरा टी-शर्ट आणि पाकिस्तानचा झेंडा असलेल्या हिरव्या रंगाच्या दुपट्ट्यासह दिसत आहे. यात “ये दुश्मन आगे बढ तो सही, तेरा नाम निशाना मिटा देंगे, हम पाकिस्तानी फौजी हे तेरी इट से इट बजा देंगे” असे गाणे वाजताना दिसते.सध्याच्या तणावपूर्ण राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत, जाणीवपूर्वक अशा प्रकारचा व्हिडिओ स्टेटस ठेवून रसूल उर्फ गबु यासीन पठाण याने सार्वजनिक शांतता भंग करण्याचा, दंगल घडवण्याचा आणि वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या कृत्यामुळे देशाविरुद्ध किंवा सार्वजनिक शांततेविरुद्ध अपराध करण्यास इतरांना प्रवृत्त करण्याचा धोका निर्माण झाल्याचेही यात नमूद आहे.समाजात भयग्रस्त वातावरण करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या कृत्यामुळे देशाविरुद्ध किंवा सार्वजनिक शांततेविरुद्ध अपराध करण्यास इतरांना प्रवृत्त करण्याचा धोका निर्माण झाल्याचेही यात नमूद आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!