शिवाजी खैरे यांना श्रीकृष्ण भूषण पुरस्कार व ममता सिंधुताई सपकाळ यांना लतानानी तांबे भूषण पुरस्कार प्रदान
ओतूर दि.२२ – ग्राम विकास मंडळ ओतूर यांचे विद्यमाने कै.आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे उर्फ झांबर यांचा ५२ वा स्मृतिदिन रविवार २१ सप्टेंबर २०२५ रोजी चैतन्य गार्डन मंगल कार्यालय ओतूर या ठिकाणी शरद सोनवणे आमदार, जुन्नर तालुका यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाल्याची माहिती ग्राम विकास मंडळ,ओतूरचे अध्यक्ष अनिल तांबे व सचिव प्रदीप गाढवे यांनी दिली.
दरवर्षी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना गेली ३० वर्षे या सन्मानाने सन्मानित केले जाते . आतापर्यंत ४५ व्यक्तिंना या भूषण पुरस्काराने गौरविण्यात आल्याची माहिती भूषण पुरस्कार समितीचे कार्यवाह भाऊसाहेब खाडे यांनी सांगितले.
यावर्षीचा कै.आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा श्रीकृष्ण भूषण पुरस्कार , मानपत्र , मानचिन्ह पंचायत समिती जुन्नरचे माजी सभापती शिवाजी नामदेव खैरे यांना प्रदान करण्यात आला . तसेच पहिल्या महिला आमदार कै.लता श्रीकृष्ण तांबे यांचे स्मरणार्थ दिला जाणारा भूषण पुरस्कार, मानपत्र व मानचिन्ह सन्मती बालनिकेतन,
हडपसर,पुणे च्या ममता सिंधुताई सपकाळ यांचे वतीने प्रतिनिधी म्हणून आलेल्या संचालिका सीमा दिपक घाडगे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद सोनवणे आमदार,जुन्नर तालुका,सत्यशिल शेरकर चेअरमन,श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना,ग्राम विकास मंडळ ओतूरचे अध्यक्ष अनिल तांबे,अनंत चौगुल,ओतूर च्या सरपंच छाया तांबे यांच्या हस्ते सन्मानाने प्रदान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना ममता सिंधूताई सपकाळ यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना सीमा दिपक घाडगे म्हणाल्या की,सिंधूताईंचे काम पुढे नेत आहोत. आपण सर्वजण माईच्या कार्याला हातभार लावत आहात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देते. आपण कितीही मोठे झालोत तरी एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याचे पाय जमिनीवर असतात त्यांचे हात लवकर आभाळाला लागतात.
समाजाची प्रत्येक गरज आपल्याला कळायला हवी. ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे त्याठिकाणी मदत केली पाहिजे. या ठिकाणी सत्कार केला जो सन्मान केला त्यामुळे नक्कीच कामाची अधिक प्रेरणा मिळेल. सर्व ओतूरकरांना मनापासून धन्यवाद.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना.
शरद सोनवणे ( आमदार,जुन्नर तालुका ) म्हणाले की,झांबर यांच्यासारखा देवमाणूस होणे नाही. कै.आ श्रीकृष्ण तांबे हे दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांच्या कामाचा वसा व वारसा आपण सर्वांनी पुढे नेला पाहिजे खऱ्या अर्थाने त्यांना ती आदरांजली होईल. काम करताना खूप कष्ट करावे लागतात. संघर्षाला मित्र करा.संघर्ष कराल तर यशस्वी व्हाल.
त्या काळात झांबर यांनी संघर्ष केला,आयुष्यात येणाऱ्या चढ – उतारांना ते सामोरे गेले. जुन्नरचं सोन करण्याचं काम त्यांनी केलं. काम अस करा नाव झालं पाहिजे,नाव असं करा की,काम झाल पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे झांबर, याप्रसंगी प्रभाकर तांबे,राजेंद्र डुंबरे,माधवराव डुंबरे, वैभव तांबे,रघुनाथ तांबे,सुजितभाऊ खैरे,विशाल तांबे,मोहित ढमाले,
प्रशांत डुंबरे,सचिन आंबडेकर , तुषार थोरात ,संतोष तांबे,विनायक तांबे ,भानुविलास गाढवे,रघूनाथ शिंदे,प्रभाकर शिंदे,किशोर कवडे,धनंजय डुंबरे,निलम तांबे, अनुराघ फापाळे,नितीन पाटील,सचिन घोलप,शरद डुंबरे,संदेश ऐरंडे, के.एस.ढोमसे,चांदशेठ मोमीन,संजय शिंदे,रंगनाथ घोलप, रामकृष्ण घोलप,पांडूरंग ताजणे,महेंद्र पानसरे,जी.आर. डुंबरे,संतोष डुंबरे,भास्कर डुंबरे,
जया डुंबरे,दशरथ डुंबरे,अनिल डुंबरे,प्रवीण वल्हवणकर, आत्माराम गाढवे,अमोल डुंबरे, रोहिदास घुले,सिताराम डुंबरे, नंदू भोर,चंद्रशेखर डुंबरे,नितीन तांबे,किशोर तांबे,गोविंद डुंबरे,अशोक अहिनवे,रामदास तांब ,प्रकाश डुंबरे,शांताराम पानसरे,राजश्री भालेकर,अजित कर्डिले,प्रतिक अकोलकर, शरद माळवे,बबनराव डुंबरे, गणी मोमीन,संजय हिरे,अनिल उकिरडे आदी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी तालुकास्तरीय वत्कृत्व स्पर्धेतील बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम विकास मंडळ,ओतूरचे सचिव प्रदीप गाढवे यांनी केले. सुत्रसंचलन पुरस्कार समितीचे कार्यवाह भाऊसाहेब खाडे यांनी केले.आभार सहसचिव पंकज घोलप यांनी मानले.
