बेल्हे- बोरी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
1 min read
बेल्हे दि.१९:- तांबेवाडी (ता. जुन्नर) येथील बेल्हे – बोरी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवार दि.१८ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अमोल कारंडे (वय २६) राहणार हांडेवाडा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर यांच्या दुचाकीला (एमएच १७ सीएन ६९२८) अज्ञात वाहनाने धडक झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
सदर व्यक्तीला उपचारासाठी आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघातात नंतर अज्ञात वाहनचालकाणे वाहन घेऊन अपघात स्थळावरून पलायन केले.
अशी फिर्याद राहुल कारंडे (वय २३ राहणार नारायणगाव ता. जुन्नर) यांनी आळेफाटा पोलिसात दिली आहे. सदर अपघाताचा पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल संतोष टावरे करत आहेत.
दरम्यान बोरी- बेल्हे रोडवर अनेक खड्डे पडले असल्यामुळे या ठिकाणी अपघातात वारंवार अपघात होत आहेत. सदर रस्त्याचे खड्डे बुजवण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिली आहे. तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

