बनावट कागदपत्रे देऊन शिक्षकांच्या नियुक्त्या; शिक्षण अधिकाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

1 min read

अहिल्यानगर दि.२३:- अधिकृत पदभार नसताना पदाचा गैरवापर करून बनावट दस्तावेज तयार करून चार शिक्षकांना नियुक्त्या दिल्याचा धक्कायदायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यासह तिघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता.२१) गुन्हा दाखल झाला. ही घटना २०१३ ते १४ दरम्यान घडली.तत्कालीन शिक्षण अधिकारी सुलोचना पंढरीनाथ पटारे, वरिष्ठ सहायक जे.जे.वाघ, संस्थेचे सचिव रज्जाक अहमद शेख (दोघे मयत), असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी विलास अशोक साठे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शिक्षण विभागात कार्यरत आहेत. शिक्षण विभागातील नोंदवही सापडत नव्हती. याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने शिर्डी येथील उर्दू एज्युकेशन सोसायटीतील चार शिक्षकांना बनावट कागदपत्रे देऊन नियुक्त्या दिल्या गेल्या आहेत, असा अहवाल दिला. त्यानुसार फसवणूक केल्याप्रकरणी पटारे यांच्या तिघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!