श्री हॉस्पिटलच्या वतीने नळवणे येथे मोफत रक्तगट तपासणी शिबिर संपन्न

1 min read

आणे दि.१८:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व पठार भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नळवणे, नवलेवाडी, सुरकुलवाडी येथील इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गातील एकूण 105 विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली.नळवणे गावचे हॉस्पिटलचे डॉ. सचिन शिंदे व डॉ. मनीषा शिंदे यांच्या संकल्पनेतून व संतोष शिंदे यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नळवणे येथे हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नळवणे मुख्याध्यापक संभेराव, चिकणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश देशमुख, माजी तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग गगे ,भागा शेंगाळ, पोलीस पाटील शिल्पा गगे तसेच श्री हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक कृष्णा रोकडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ तुषार चव्हाण अक्षदा ढमाले व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!