वळसे पाटील महाविद्यालयात रक्षाबंधन, ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन साजरा

1 min read

निमगाव सावा दि.९:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयामध्ये रक्षाबंधन, ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग, इतिहास विभाग व सांस्कृतिक विभाग संयुक्त विद्यमाने करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन आणि विद्यापीठ गीताने झाली.रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी वृक्षांना राखी बांधून बंधुभाव, स्नेह व एकतेचा संदेश दिला. प्रा. अनिल पडवळ यांनी रक्षाबंधन हे बहिण भावाच्या नात्यातील प्रेम, विश्वास व जबाबदारीचा उत्सव असून हा पवित्र सण आपले मित्र, सहकारी, समाज, शेजारी आणि निसर्ग यांच्याशी असलेले रक्षणाचे नाते अधोरेखित करत असल्याचे सांगितले.ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य संग्रामातील या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व प्रा. अजय नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांना उलगडून सांगितले. प्रा.ज्योती गायकवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास, स्वयंसेवकाची कर्तव्य याविषयी माहिती देऊन या विविध कार्यक्रम प्रसंगी आज आपण राष्ट्रीय सेवा योजना एककाचे उद्घाटन करीत असल्याचे नमूद केले. तर जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाची परंपरा, संस्कृती व त्यांचे हक्क या विषयांवर प्राचार्य प्रा.प्रल्हाद शिंदे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाप्रसंगी साक्षी निकम, साक्षी गाडगे, अनिता कुसुरवसे या विद्यार्थिनींनी रक्षाबंधन,क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपले मनोगते व्यक्त केली. तसेच प्रा. स्नेहल जाधव, प्रा. उत्तरा काटे, प्रा. श्रीविद्या रणदिवे, प्रा. आकाश धुमाळ यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.संदिपान पवार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन आणि रक्षाबंधनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी अहिल्यानगर येथील एम.आय.आर.सी. मिलिटरी कॅम्प मधील जवानांसाठी 100 राख्या आणि शुभ संदेश पाठविल्याबद्दल सर्व विद्यार्थिनी भगिनींचे कौतुक केले.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार,प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे, सर्व प्राध्यापक व कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोनाली ढोबळे व प्रा.मनीष रहाताडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. सुभाष घोडे तर आभारप्रदर्शन प्रा. योगेश भालेराव यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!