मुंबई-नागपूर विशेष ट्रेन ६ तास लेट; प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरत व्यक्त केला संताप
1 min read
मुंबई दि.९:- मध्य रेल्वेकडून मुंबई-नागपूर विशेष ट्रेन ही गाडी जाहीर करण्यात आली होती. मात्र, रात्री 12.20 वाजता सुटणारी गाडी सकाळी 6 वाजले तरी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये न आल्यानं प्रवासी प्रंचड संतापले. त्यांनी रेल्वे ट्रँकवर उतरून आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, मध्य रेल्वेचं या घटनेसंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही.मुंबई-नागपूर विशेष ट्रेन सहा तास उलटून ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये आलीच नाही. यामुळं या ट्रेनसाठी ज्यांनी बुकिंग केलं होतं ते प्रवासी प्रचंड संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. प्रवाशांनी रेल्वे स्थानक परिसरात आक्रमक भूमिका घेतली.
मध्य रात्री 12.20 वाजता सुटणारी विशेष ट्रेन सहा तास उलटले तरी आली नाही.रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून चालकाशी संपर्कच होत नसल्याचे कारण दिलं जात आहे, अशी माहिती आहे. दरम्यान, 6.45 च्या दरम्यान मुंबई-नागपूर विशेष ट्रेन स्टेशनमध्ये दाखल झाली, अशी माहिती आहे.
मध्यरात्री 12 वाजल्यानंतर सुटणारी मुंबई नागपूर विशेष ट्रेन सहा तास उलटल्यानंतर देखील न आल्यानं संतापलेल्या प्रवाशांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आक्रमक भूमिका घेतली. यावेळी प्रवाशांना रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेराव देखील घातला.
मुंबई नागपूर विशेष ट्रेनच्या प्रवाशांनी सहा वाजता निघणारी गीतांजली एक्सप्रेस जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. संतापलेल्या प्रवाशांनी रेल रोको करण्याचा निर्णय घेतल्याचं देखील दिसून आलं. काही प्रवासी रेल्वे ट्रॅकवर जाऊन उभे राहिले होते. गीतांजली एक्स्प्रेस ही दररोज सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
मुंबईहून नागपूरला जाते. विशेष ट्रेनचे प्रवासी ही ट्रेन सुटण्यापूर्वी आक्रमक झाले होते. सात तासानंतर देखील मुंबई -नागपूर विशेष ट्रेन न सुटल्यानं प्रवाशांनी सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केला आहे.
