कर्जदारांसाठी मोठी बातमी ! रेपो रेट ‘जैसे थे’, कर्जाचा हप्ता वाढणार का ?
1 min read
मुंबई दि.६:- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची 4 ऑगस्ट रोजी MPC बैठक सुरु झाली आणि एमपीसी समितीने घेतलेल्या निर्णयाची आज 6 ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली आहे. आरबीआयने गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी MPC बैठकीतील निर्णयाची माहिती दिली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले MPC समितीने एकमताने Repo Rate महंजर एकूण व्याजदर 5.5 टक्क्यांवर ‘जैसे थे’ ठेवायचा निर्णय घेतला आहे. म्हणजे ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांचा ईएमआय देखील कमी होणार नाही कारण सामान्यतः बँका कर्जाचे दर तेव्हाच कमी करतात.
आरबीआय रेपो दर कमी करते. सध्याच्या घोषणेनुसार तुमच्या कर्जाच्या EMI वर कोणताही परिणाम होणार नाही आणि कमी होणार नाही किंवा तुमचा भार वाढणार नाही तर जितका भार आहे तितकाच कायम राहणार आहे.
याशिवाय तुम्ही नव्याने उच्च व्याजावर कर्ज घेतले असेल आणि तुम्हाला EMI वर दिलासा अपेक्षित होता तर यावेळी रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे कर्जदारांवरील उच्च ईएमआयचा बोजा कायम राहणार आहे.
