कांदा व्यापाऱ्याची १३ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
1 min read
अहिल्यानगर दि.६:- अहिल्यानगर येथील नेप्ती उपबाजार समितीत असलेल्या कांदा व्यापाऱ्याची १३ लाख ३२ हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पुणे येथील तिघांविरोधात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित अंकुश कापरे, गोरक्ष अंकुश कापरे, प्रमोद गोकुळ जगताप (सर्व रा. नागरे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ही घटना १४ मार्च २०२० ते २१ मार्च २०२० दरम्यान घडली आहे. याबाबत राहुल रामदास आंधळे
(रा. पारिजात कॉर्नर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा कांदा विक्रीचा व्यवसाय असून सदरील व्यक्तींनी ट्रान्स्पोर्टद्वारे कांदा खरेदी करून १३ लाखांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
