राशीनच्या घटनेचा फुले ब्रिगेडच्या वतीने निषेध; अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन

1 min read

राशीन दि.५:- कर्जत तालुक्यातील राशीन येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या नावाच्या पाट्यांची व सर्कलची तोडफोड करुन विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फुले ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना निवेदन देण्यात आले आहे.

यांची उपस्थिती
यावेळी शहराध्यक्ष दीपक खेडकर, राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, किरण जावळे, विक्रांत शिरसाठ, शुभम दळवी, निखिल ताठे, आशिष भगत, विक्रम बोरुडे, सुरज उमाप, सुरेंद्र सिंग, अनुराग पडोळे, प्रकाश वाघमोडे, ब्रिजेश ताठे, महेश सुडके, किरण पंधाडे, संकेत लोंढे, संकेत खरपुडे, संतोष हजारे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेतील समाजकंटकांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी. अन्यथा शहरात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा फुले ब्रिगेडच्या वतीने दीपक खेडकर यांनी दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!