महसूल सप्ताहाच्या निमित्ताने आळे येथे वृक्षारोपण

1 min read

आळे दि.५:- महसूल सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र गुड्डी तसेच उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे तहसीलदार डॉक्टर सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आळे (ता.जुन्नर) या ठिकाणी पानंद रस्ते दुतर्फा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रितम काळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर कुऱ्हाडे,गावचे सरपंच सखाराम भंडलकर, उपसरपंच मंगेश कु-हाडे, सदस्य बाजीराव लाड, मंगल तीतर, लता वाव्हळ, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब वनघरे, सविता भुजबळ, विजय कु-हाडे, दिगंबर घोडेकर, अर्चना गुंजाळ, ज्योती शिंदे, सुधाकर काळे, गौरी भंडलकर, जयश्री डावखर, रज्जाउद्दीन मोमीन, सोनाली वाघोले, उर्मिला कु-हाडे, विशाल मेंगळे, अन्वर शेख युवराज देसाई, ज्ञानमंदिर चे ट्रस्टी सुधीर वाव्वळ, दत्तात्रय लाड, मनोज काळे, बाळासाहेब चितळे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच यावेळी चिंच ,आवळा,वड या जातीची सुमारे शंभरहून अधिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!