बोरिवली तहसील कार्यालयात महसूल सप्ताह साजरा
1 min read
मुंबई दि.२:- राज्याचे महसूलमंत्री श्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात, मंडळ स्तरावर दिनांक ०१/ऑगस्ट २०२५ ते ०७ ऑगस्ट २०२५ या कालावधी मध्ये महसूल सप्ताह साजरा होत आहे.
त्यानुसार तहसीलदार बोरिवली कार्यालयात दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी, मा. तहसीलदार श्री इरेश चप्पलवार यांच्या अध्यक्षतेखाली ११-०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला.या वेळी मा.रमाकांत पाटील सेवा निवृत्त तहसीलदार, मा. आनंद माईंगडे सेवा निवृत्त नायब तहसीलदार,
व इतर सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा मा.तहसीलदार यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नागरिकांचे विविध प्रकारचे दाखले मा. तहसीलदार व सत्कार मूर्ती यांच्या हस्ते देण्यात आले.या प्रसंगी कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व बोरिवली तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
तहसीलदार साहेबांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शासनाच्या सर्व सेवांचा नागरिकांना सुलभ व योग्यरीत्या लाभ मिळावा याकरिता महसूल विभाग नेहमी तत्परतेने कार्यरत आहे. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने विविध योजना व सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
