राहाता तालुक्यात आढळला सिंह; फोटो व्हायरल

1 min read

राहाता दि.३१:- राहाता तालुक्यातील राहाता-पिंपळवाडी शिवारात अनिल सदाफळ यांच्या पेरूच्या बागेत सिंह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सिंहाचा व्हिडिओ व्हायरल होत असताना त्याची खातरजमा केली असता या परिसरात सिंह भटकंती करत असल्याचे समोर आले आहे.

परिसरातील नागरिक भयभीत
राहाता पिंपळवाडी रस्त्यालगत सदाफळ वस्तीवर अनिल सोपानराव सदाफळ यांच्या पेरुच्या बागेत एका कामगाराला सिंह दिसून आला. समयसुचकता ठेवून या कामगाराने या सिंहाचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावून या सिंहाला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!