हरिद्वार येथील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी,सहा भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
1 min read
देहरादून दि.२९:- उत्तराखंडमधील हरिद्वार येथील प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून सुमारे 25 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही दुर्घटना मंदिराच्या पायऱ्यांजवळ सकाळच्या सुमारास घडली.
रविवार असल्याने भाविकांची संख्या सामान्यपेक्षा अधिक होती. मातेच्या दर्शनासाठी भाविक रांगेत उभे होते. याच दरम्यान अचानक धक्काबुक्की सुरू झाली आणि त्याचे चेंगराचेंगरीत रूपांतर झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू असून अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे.
