साळवाडी ते शिरोली रस्ता दुरुस्ती ची मागणी

1 min read

बेल्हे दि.२४:- साळवाडी ते शिरोली सुलताणपुर या रस्त्याची दुरावस्था झाली असुन या रस्त्याची दुरूस्तीची मागणी या परीसरातील नागरीकांनी केली आहे.या दोन गावांमधील अंतर फक्त तीन किलोमीटर आहे.परंतु हे तीन किलोमीटर अंतर पार करायला या भागातुन जाणाऱ्या प्रवाशांना तसेच ग्रामस्थांणा सुमारे अर्धा तासाहून अधिक वेळ लागत आहे. तसेच या रस्ता अतीशय रूंद असुन दोन्हीही बाजुला मोठमोठाली झाडे झुडपे आहेत. या रस्त्यावर अनेक ठिकाणी वेडी वाकडे वळणे आहेत. त्यातच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. आणखीन या भागातील काही शेतक-यांणी हा रस्ता खोदून पाईपलाईन नेली आहे.परंतु ही लाईन नेल्यानंतर त्या ठिकाणचा खड्डा व्यवस्थित न बुजविल्याने रस्त्यावर आणखीनच खड्डयांची भर पडली आहे. तसेच येथील ग्रामस्थांणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याच्या दुरूस्ती बाबत वारंवार पत्रव्यवहार केला असुन सुध्दा रस्त्याच्या कामाला सुरवात कधी होणार असा प्रश्न येथील ग्रामस्थ तसेच प्रवाशांना पडला आहे. खड्डयांमुळे वारंवार अपघात होऊ लागले आहेत तसेच सध्या ऊस तोडणी चालु झाली आहे .हा रस्ता अरूंद असल्याने जड वाहणे खाली उतरत नाहीत यामुळे समोरून येणारे वाहणे व जड वाहतुक करणारे चालक यांच्यामध्ये भांडणे होऊ लागली आहेत.तरी या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे मागणी ग्रामस्थांणी केली आहे‌. अन्यथा लवकरच रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा कडक इशारा या परीसरातील नागरीकांनी दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!