लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न
1 min read
निमगाव सावा दि.२३:- येथील श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे होते. या वेळी प्रा. अनिल पडवळ यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन केले. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
आपल्या जहाल लेखणीतून केसरी आणि मराठा या वृत्तपत्रातून अन्यायाला वाचा फोडली.तसेच ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीचा अधिकार केला. प्रा नीलम गायकवाड यांनी टिळकांचे “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या घोषणेमागील प्रेरणादायी विचारांची सविस्तर माहिती दिली.
एन.एस.एस. विभाग, आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुभाष घोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण गोरडे यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
