बांगलादेशमध्ये हवाई दलाचं विमान शाळेवर कोसळलं; शाळा परिसरात उडाला हाहाकार; पायलटचा मृत्यू; अनेकजण जखमी

1 min read

ढाका दि.२१:- बांगलादेशची राजधानी ढाका येथे एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. बांगलादेशमधील हवाई दलाचं विमान वेगाने आलं आणि थेट एका शाळेवर कोसळलं आहे. या मोठा दुर्घटनेत विमान पायलटचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेश हवाई दलाचे एक F-7 प्रशिक्षण विमान आज दुपारी १:३० वाजता राजधानी ढाका येथील उत्तरा भागातील दियाबारी भागात कोसळले. विमान माइलस्टोन कॉलेजच्या नॉर्थ कॅम्पसमध्ये असलेल्या शाळेवर कोसळले आणि शाळा आणि आजूबाजूच्या परिसरात गोंधळ उडाला. या अपघाताचे काही व्हिडिओ घटना घडल्याच्या क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. F-7 हे चिनी विमान आहे. अशीही माहिती समोर येतेय की, बांगलादेश हवाई दलाच्या F-7 प्रशिक्षण विमानाने दुपारी १:०६ वाजता उड्डाण केले आणि २४ मिनिटांनी दुपारी १:३० वाजता शाळेवर कोसळले मात्र अद्याप जीवितहानी बद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.हवाई दलाचं प्रशिक्षण विमान ढाक्यातील माईलस्टोन शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात कोसळलं. माईलस्टोन शाळा आणि महाविद्यालय ढाक्याच्या उत्तरा परिसरात आहे. दुपारच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी शाळेत विद्यार्थी आहेत. Bangladesh Plane Crash चे काही व्हिडीओ समोर आले आहेत. विमान कोसळताच त्याला आग लागली. यानंतर धुराचे लोट आसमंतात पसरले.बांगलादेशच्या हवाई दलाचं एफ-७ विमान दुपारी दीडच्या सुमारास (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १ वाजता) राजधानी ढाक्याच्या उत्तरेला असलेल्या दियाबारी परिसरात कोसळलं. माईलस्टोन शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात विमान कोसळताच एकच घबराट पसरली. शेजारच्या भागात धावाधाव सुरु झाली. या अपघाताचे अनेक व्हिडीओ आता समोर आले आहेत. त्यामध्ये शाळेचे विद्यार्थी सैरावैरा पळताना दिसत आहेत. अपघाताची माहिती मिळताच बांगलादेशी सैन्याचे जवान, अग्निशमन दलाचे जवान आणि नागरी संरक्षण दलाच्या ८ तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी मदतकार्याला सुरुवात केली. दुपारी १ वाजून १८ मिनिटांनी अपघाताची माहिती मिळाल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. या अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात माईलस्टोन महाविद्यालयाच्या आवारात आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसत आहेत. अपघातातील जखमींच्या आकड्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!