शिक्षक बँकेची वार्षिक सभा अनपेक्षितपणे शांततेत
1 min read
अहिल्यानगर दि.२१:- दर वर्षी गोंधळ आणि गदारोळामुळे चर्चेत असणारी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा काल (ता. २०) शांततेत झाली. सत्ताधारी गटापेक्षा विरोधकांनी गोलमोल भूमिका घेतल्याने या सभेमध्ये मागील वेळेप्रमाणे फारशी वादावादी झाली नाही.
उलट विरोधी गटातील सदस्यांची भाषणे सत्ताधाऱ्यांना पूरक अशी झाल्याने विरोधक मॅनेज झाल्याचा आरोप काही सभासदांनी केला.बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब तापकिर, उपाध्यक्ष योगेश वाघमारे, संचालक सर्वश्री संदीप मोटे,
रामेश्वर चोपडे, बाळू सरोदे, कैलास सारोक्ते, निर्गुणा बांगर, रमेश गोरे, आण्णासाहेब आभाळे, भाऊराव राहिज, शशिकांत जेजुरकर आदींसह संचालक, सभासद, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जगताप उपस्थित होते.
