खून करण्यासाठी मुलाला चाकू पुरवणारा बाप गजाआड
1 min read
अहिल्यानगर दि.१७:- अहिल्यानगर शहरातील सीताराम सारडा विद्यालयात एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यांचा खून केला होता. या प्रकरणात संशयित आरोपीला चाकू देऊन मदत करणाऱ्या आरोपीच्या बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत करण्यात आला आहे.
वसिम हमीद शेख (वय ४०,रा.सर्जेपुरा, कैलारु कॅम्प, ता. जि. अहिल्यानगर),असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत बागडपट्टी परिसरात असलेल्या एका शाळेत चाकू मारून विद्यार्थांचा खून करण्यात आला होता.या घटनेतील संशयित आरोपी पसार झाला होता.
तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपीला चाकू देणारा हा मुकुंदनगर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.
