खात्यात चुकून आलेले पैसे ओतूरच्या डुंबरे गुरुजींनी केले परत
1 min read
ओतूर दि.१५:- नजरचुकीने ओतूर (ता. जुन्नर) येथील सेवानिवृत्त शिक्षक दशरथ भिमाजी डुंबरे यांच्या बँक खात्यात जमा झालेले सुमारे ७५ हजार रुपये ज्याचे होते त्याला परत देण्यात यावे, यासाठी बँकेत जाऊन अर्ज करून परत करण्यास सांगितले.त्यामुळे आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन या सेवानिवृत्त आदर्श शिक्षकाने घडविले आहे.
याबद्दल दशरथ गुरुजी यांच्या प्रामाणिकपणाचे ओतूर आणि
परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. गुरुजींचा प्रामाणिकपणा खरंच वाखाणण्याजोगा आहे! त्यांनी बँकेतून त्यांच्या खात्यात चुकून जमा झालेले ७५हजार रुपये परत करून जनसामान्यांत एक चांगली शिकवण दिली आहे. प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचं महत्व त्यांनी दाखवून दिलं आहे.
अकाउंटला आलेले हे पैसे नेमके कोणी पाठवले हे दशरथ डुंबरे गुरुजी यांच्याही लक्षात येत नव्हते. शेवटी त्यांनी थेट बँकेत जाऊन रितसर अर्ज करत ते पैसे संबंधित खातेधारकास देण्याची विनंती करून आपला प्रामाणिकपणा आणि नैतिकतेचे महत्व दाखवून दिले. दरम्यान या प्रामाणिकपणाबद्दल ओतूर येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक दशरथ डुंबरे गुरुजी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतिक्रिया
“माझ्या खात्यात नजरचुकीने आलेली रक्कम माझी नव्हती. मी त्यावर हक्क सांगूच शकत नाही. जे आपले नाही ते स्वतःकडे ठेवणे चुकीचे आहे. त्यामुळे ही रक्कम योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हे माझं नैतिक कर्तव्य होते. मी फक्त एक माणूस म्हणून माझी जबाबदारी पार पाडली आहे.”
– दशरथ डुंबरे, ओतूर
