पतसंस्था अपहार प्रकरणी अध्यक्षांसह दहा जणांवर गुन्हा दाखल

1 min read

सोमेश्वरनगर दि.१४:-येथील गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित निंबूत येथे झालेल्या दीड कोटी रुपयांच्या अपहारामध्ये यापूर्वी दोन जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आता नव्याने दहा जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. पतसंस्था अध्यक्ष राहुल विलासराव काकडे यांचा समावेश आहे.श्री गणेश बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित निंबूत येथे यापूर्वी सचिव सतीश काकडे व क्लार्क नरहरी कुलकर्णी यांच्यावर अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता अध्यक्ष व संचालकांनाही आरोपी केले आहे. गणेश ग्रामीण पतसंस्थेमध्ये सन २०१८, २०१९, २०२० च्या दरम्यान साधारण दीड कोटी रुपयांचा अपहार झाला असून संस्थेचे चेअरमन राहुल काकडे व त्यांचे नातेवाईक यांनी पतसंस्थेमधील पैसे है प्रापंचिक खर्चासाठी वापरले.त्यामध्ये पाइपलाइन करीता नावे रोख, बालाजी विमान टिकीट नावे रोख, जेसीबी भाडे नावे रोख, अशा नोंदी आढळल्या आहेत.शेखर विलास शिंदे (प्रमाणित लेखापरीक्षक तालिका क्रमांक १२०५३), व राहुल श्रीरंग आदलिंगे (प्रमाणित लेखापरीक्षक तालिका क्रमांक ११०२९) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाने संस्थेचे ऑडिट करण्यासाठी ऑडिटर राहुल आदलिंगे, शेखर शिंदे यांची नेमणूक केली असताना देखील त्यांनीही संस्थेचे खोटे ऑडिट करून संस्थेमध्ये सर्व व्यवस्थित चालले असल्याबाबतचा खोटा अहवाल शासनाला सादर करुन त्याबाबतची शासनाची माफी देखील मागितली आहे, पुरावे पोलिसांना मिळाले असून गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी अध्यक्ष राहुल विलास काकडे,संचालक उमेश उत्तम काकडे,औदुंबर दिगंबर ननवरे,रामचंद्र मल्हार राव रणवरे,अविराज बाळासाहेब काकडे,संचालिका सुवर्णा अभय काकडे,रोहिणी रतन राव काकडे,रतन शंकर बनसोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!