पोलिसाकडूनच महिलेची फसवणूक; ७३ तोळे सोन्यासह १७ लाख लुबाडले; गुन्हा दाखल

1 min read

पुणे दि.९:- पोलिसांच्या प्रतिमेस काळिमा फासणारी घटना समोर आली असून, पुणे पोलीस दलातील गणेश जगताप या कर्मचाऱ्याने ५१ वर्षीय महिलेची तब्बल ७३.५ तोळे सोने आणि १७ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी चतुः शृंगी पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, जगताप आणि फिर्यादी महिला पूर्वीपासून ओळखीचे आहेत. त्याचा फायदा घेत जगताप यांनी पत्नीला कॅन्सर झाल्याचे, तसेच मुलगी MBBS शिक्षण घेत असल्याचे खोटे सांगून महिलेच्या कुटुंबाकडून लाखो रुपये, सोने घेतले. जगतापने ऑक्टोबर २०१९ मध्ये २४.६ तोळे, तर जानेवारी २०२० मध्ये ४८.९ तोळे असे एकूण ७३.५ तोळे सोने घेतले. त्याचप्रमाणे महिला, तिचे पती आणि मुलाकडून वेळोवेळी रोख रक्कम, धनादेशही घेतले. फिर्यादीने पैसे, दागिने परत मिळत नसल्याने थेट पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने करत आहेत. २१ ऑगस्ट २०२४ रोजी जगताप यांची बदली पोलीस मुख्यालयातील विशेष शाखेत झाली. तेथे ते अनुपस्थित राहिले. दरम्यान, औंधच्या एका सराफी व्यावसायिकालाही त्यांनी गंडवले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगत ८ लाख २२ हजारांचे दागिने घेतले. पैसे मागितल्यावर सराफाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तत्कालीन विशेष शाखेचे उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी जगताप यांना निलंबित केले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!