दिंडीत मॉडर्न स्कूल च्या विद्यार्थांनी घेतली आई- वडिलांची सेवा करण्याची शपथ
1 min read
बेल्हे दि.६ (वार्ताहर) :- मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे (ता.जुन्नर) या शाळेच्या विदयार्थीनी बेल्हे गावामध्ये दिंडीचे आयोजन केले होते. यावेळी बेल्हे बस स्थानकावर शाळेच्या प्राचार्या विद्या घाडगे यांनी विद्यार्थी तसेच उपस्थित सर्वांना आई-वडिलांची सेवा करण्याची शपथ दिली.
१ ली ते १२ वी चे ९०० विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. श्रावण बाळाची कावड ही दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी बनवली होती. यामध्ये विठ्ठल – रुक्मीणी, संत जनाबाई, संत नामदेव,संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, अशा विविध संतांची वेशभूषा विद्यार्थांनी केली होती.
पारंपरिक ,विना,पखवाज या वादयांच्या नादात विदयार्थी माऊली- माऊली, विठोबा-रखुमाई म्हणत होते. गावातील ग्रामस्थांनी या दिंडीचे स्वागत केले. शाळेच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका सुमन ढवळे यांच्या हस्ते बेल्हे बसस्थानकावर विठ्ठलाची आरती झाली. चिमुकल्या मुलांनी डोक्यावर तुळशी व हातात टाळ घेतला होता.
काही विद्यार्थ्यांनी ही हातात टाळ ,पताका व विना घेऊन माऊली माऊली चा जयघोष विद्यार्थी करत होती. लहान चिमुकल्यांना वारकऱ्यांच्या वेशात पाहून सर्व ग्रामस्थ त्यांचं कौतुक करत होती. आई वडिलांची सेवा करा, त्यांचा सांभाळ करा, मोठ्यांचा आदर राखा अशी शपथ विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित बेल्हे ग्रामस्थानी घेतली.
दिंडीत विद्यार्थांनी समाज प्रबोधन पर घोषणा दिल्या तसेच मेघराजला बरसून बळीराजाला सुखी करण्याचं आवाहन विद्यार्थ्यांनी विठ्ठलाकडे केलं. यावेळी शाळेच्या जेष्ठ मार्गदर्शिका सुमन ढवळे, संस्थेचे विश्वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे,
उपप्राचार्य के.पी.सिंग, शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही सहभाग घेतला होता. यावेळी संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे व सर्व संचालक मंडळांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
