सरदार पटेल हायस्कूल चे विद्यार्थी विठुनामाच्या गजरात दंग
1 min read
आणे दि.३:- आणे (ता.जुन्नर) येथील सरदार पटेल हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी पायी दिंडीचा आनंद लुटला. शाळेच्या प्रांगणापासून नव्या वेशीतून दिंडी नवीन एस टी स्टँड मार्गे श्री रंगदास स्वामी मंदिरात प्रवेशित झाली. श्रींच्या आरतीचा भव्य सोहळा अनुभवत खिचडीचा आस्वाद घेत
दिंडी ग्राम प्रदक्षिणा घालत पुन्हा नांदूररोडने शाळेत पोहचली,अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक धोंडिभाऊ शिंदे यांनी दिली.दिंडीचे स्वागत देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते, माजी अध्यक्ष विनायक आहेर, व्य.स.अध्यक्ष बंडू आहेर, पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर,
शिंदेवाडीचे उपसरपंच खंडू बेलकर, बाळासाहेब दाते, माजी सरपंच अजित शिंदे यांनी केले.या पायी दिंडीचे नियोजन सुरेखा कदम यांनी केले.याकामी मुक्ताबाई देवस्थान व यमाईमाता देवस्थानचे सहकार्य लाभले.
