डिसेंट फाउंडेशन तर्फे महिलांसाठी मोफत शिवणकला प्रशिक्षण व ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी
1 min read
शिरोली तर्फे आळे दि.३:- डिसेंट फाउंडेशन पुणे, हायस्पीड स्किल हब जुन्नर व ग्रामपंचायत शिरोली तर्फे आळे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सभागृह शिरोली तर्फे आळे येथे मोफत शिवणकला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिलांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी व जनजागृती देखील करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उदघाटन इनर व्हील क्लब ऑफ नारायणगाव च्या अध्यक्षा सविता खैरे, सचिव प्रीती शहा व सरपंच प्रिया खिलारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.हे प्रशिक्षण तीस दिवस चालणार असून यासाठी तीस महिलांनी नावानोंदणी केलेली आहे.
समजतील गोर गरिब व गरजू महिलांना प्रशिक्षित करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जात असल्याची माहिती डिसेंट फाउंडेशचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी डिसेंट फाउंडेशचे सचिव डॉ.एफ.बी.आतार, संचालक आदिनाथ चव्हाण,
ऍडव्होकेट सुनीता चासकर, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव मुळे, मालतीताई सोनवणे, सोनाली डावखर,सखुबाई काळे ,दत्तात्रय डावखर, ग्रामसेविका राजश्री शेलार,अजित खिलारी ,बाळकृष्ण डावखर,संभाजी शेटे, निवृत्ती पवार,
प्रशिक्षक अश्विनी खिलारी आदी मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र बोऱ्हाडे यांनी केले तर आभार शिवराम गुंजाळ यांनी मानले.
