१ कोटी ८७ लाखांची फसवणूक करणारा जेरबंद
1 min read
अहिल्यानगर दि.२८:- नियोजित लोकमंगल गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या नावाने नागरिकांची १ कोटी ८७ लाखांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजार केले असता २९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रकाश कोटा असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार नालेगाव येथील नियोजित लोकमंगल गृहनिर्माण सहकारी संस्था
स्थापन करून त्या संस्थेचे सभासद यांच्याकडून १ लाख २५ हजार रुपयांची वर्गणी घेऊन त्यांची एक कोटी ८७ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
