मॉडर्नच्या ९०० विद्यार्थ्यांना केला एकत्र योगा

1 min read

बेल्हे दि.२१ (वार्ताहर):- मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) येथील योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. आर्ट ऑफ लिविंगचे शिक्षक भीमाजी भोर यांनी केजी ते १२ वीच्या एकूण ९०० विद्यार्थ्यांनी योगाचे धडे दिले. शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही शाळेच्या मैदानात एकत्र योगा केला. वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्धर व्याधी योगासनामुळे नष्ट होण्यास मदत होते. योग हि एक साधना असून सातत्य पूर्ण सरावाने मनुष्याच्या जीवनात चांगल्या प्रकारचे अमुलाग्र बदल होऊ शकतात. योगामुळे स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते तसेच प्राणायाम केल्यामुळे श्वसनाचे विकार बरे होण्यास मदत होते. गुडगे दुखी,पाठ दुखी,कंबर दुखी या पासून आराम मिळतो. त्यामुळे योग व सूर्यनमस्कार आरोग्यासाठी हितकारक आहेत असे भीमाजी भोर यांनी या वेळी संगितले. शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे यांनी विद्यार्थ्यांना रोज योगा करण्याचे आवाहन केले तसेच योगाचे फायदे सांगितले. यावेळी संस्थेचे विश्वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पि.सिंग शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.मनोहर पटाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्राचार्या विद्या गाडगे यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!