निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक; पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली कारवाई

1 min read

पुणे दि.३०:- वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणच्या मुसक्या अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आवळल्या आहेत, त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या आई-वडिलांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे.वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होतं, वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे, त्यानंतर देखील त्याची काही प्रकरण समोर आली होती, त्यानंतर तो फरार झाला होता, त्याच्याविरोधात स्टँडिंग वारंट देखील काढण्यात आलं होतं. सुरुवातील पोलिसांच्या तीन पथकांकडून निलेश चव्हाण याचा शोध घेण्यात येत होता, त्यानंतर पोलिसांची पथकं वाढवण्यात आली, सहा पोलिसांच्या पथकाकडू निलेश चव्हाणचा शोध सुरू होता, अखेर आज त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे.पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळमध्ये जाऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला धमकावल्याचा आणि त्यांच्यावर बंदूक रोखल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता, त्याने नेपाळ गाठलं होतं. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली आहे, तो वैष्णवीची नणंद असलेल्या करिष्मा हगवणे हिचा मित्र असल्याचे बोलले जात आहे. अखेर आता पोलिसांनी त्याला नेपाळमधून अटक केली आहे, त्याच्या अटकेनंतर आता या प्रकरणात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे