कोविड काळात कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना शासनाकडून ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान
1 min read
कर्जत दि.२५:- येथील तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी कै.दादासाहेब झुंबर श्रीराम यांनी कोविड काळात आपले कर्तव्य बजावत असताना प्राण गमावले.राज्य शासनाने जाहीर केलेल्या ५० लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ त्याच्या कुटुंबाला मिळावा. यासाठी सातत्याने पाठपुरावा करून विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी स्वतः विशेष लक्ष घालून हे प्रकरण जिल्हा परिषदेमार्फत मार्गी लावले.आज शनिवार दि.२४ रोजी त्यांच्या पत्नी नंदा श्रीराम व पुत्र सौरभ श्रीराम यांच्याकडे शासन निर्णयानुसार ५० लाख रुपयांचा विमा अनुदानाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
हा क्षण केवळ आर्थिक मदतीचा नव्हे, तर शासन आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे याचे उदाहरण आहे.या प्रसंगी राम शिंदे, माजी जि.प. सदस्य शांतीलाल कोपणर, भाजपा ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष शिवाजी कारंडे, जयसिंग देवकाते,
जि.प.कार्यकारी अभियंता बाळासाहेब ननवरे, गटविकास अधिकारी रुपचंद जगताप, ग्रामपंचायत अधिकारी अविनाश मेहेत्रे, ग्रामपंचायत अधिकारी शाम भोसले आदी उपस्थित होते.