समर्थ फार्मसी मध्ये एम फार्मसीच्या अभ्यासक्रमांना मान्यता
1 min read
बेल्हे दि.२४:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे या पदवी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर पदवी म्हणजेच एम फार्मसी च्या अभ्यासक्रमांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया,नवी दिल्ली यांच्याकडून परवानगी मिळाल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.समर्थ शैक्षणिक संकुल,बेल्हे ही ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या ध्येयाने कार्यरत आहे.२०१७ साली स्थापन झालेल्या समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे या महाविद्यालयात आधीपासूनच डिप्लोमा इन फार्मसी (डी-फार्मसी)-६० जागांसह आणि २०१८ मध्ये बॅचलर ऑफ फार्मसी (बी-फार्मसी)-१००
जागांसह दोन अभ्यासक्रम यशस्वीपणे सुरु आहेत.यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मसी शिक्षणासाठी एक व्यापक आणि दर्जेदार पर्याय उपलब्ध झाला आहे. संस्थेमध्ये सध्या ८ पीएचडी प्राप्त अनुभवी प्राध्यापक आणि उर्वरित इतर सर्व एम फार्म पदवी प्राप्त प्राध्यापक कार्यरत आहेत.
समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी हे विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रम शिकवण्यातच नव्हे,तर संशोधन,उद्योग अभ्यास,उद्योजकता विकासासोबत जागतिक पातळीवरील करिअरच्या संधी या बाबतीतही मार्गदर्शन करते.या अत्याधुनिक शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी प्राप्त होण्यास मदत होते.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेनुसार संस्थेला एम.फार्म (मास्टर ऑफ फार्मसी) च्या तीन प्रमुख शाखांसाठी प्रत्येकी १५ जागा मंजूर झालेल्या आहेत. मान्यता मिळालेल्या तीन शाखा पुढीलप्रमाणे: एम फार्मसी इन फार्मास्यूटीक्स,एम फार्मसी इन फार्मास्युटिकल केमिस्ट्री आणि एम फार्मसी इन फार्मास्यूटिकल क्वालिटी अशुरन्स.
या नवीन मान्यतेनंतर संस्थेतील एकूण एम.फार्म पदव्युत्तर अभ्यासक्रमांची क्षमता ४५ जागांवर पोहोचली असून,ही ग्रामीण भागातील फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी उपलब्धी मानली जात आहे. फार्मसी क्षेत्र हे औषधनिर्माण, संशोधन, गुणवत्ता नियंत्रण, विपणन, आरोग्यसेवा, औषध निरीक्षण, नियामक कार्ये आणि अकॅडमिक्स अशा विविध क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे.
समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केवळ पदवीपर्यंत मर्यादित न ठेवता आता पदव्युत्तर शिक्षणाचीही सोय उपलब्ध करून दिली आहे. फार्मास्युटिकल क्षेत्रात भविष्यातील संधी लक्षात घेता विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा नक्कीच फायदा घ्यावा असे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले.
ग्रामीण भागातील पालकांच्या मागणीनुसार आणि आग्रहास्तव सुरु केलेल्या या अभ्यासक्रमाबद्दल पालक व विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त केले जात असून ग्रामीण भागातील सर्व बी.फार्म पदवीधर विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी डॉ.कुलदीप रामटेके-७०२०७२६०१९ व डॉ.सचिन दातखिळे – ९९६०६०१५५३ यांच्याशी संपर्क साधावा.