बाबाजी बांगर यांची ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून नियुक्ती

1 min read

बोरी खुर्द दि.२२:- राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत बाबाजी बांगर (रा. बोरी खुर्द ता.जुन्नर) यांची ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीयमिशन नैसर्गिक शेती प्रशिक्षण कालावधी २० ते २३ मे या दरम्यान नॅशनल फार्मिंग सायन्स युनिव्हर्सिटी गुजरात येथे आयोजित करण्यात आले आहे. २००२ पासून नैसर्गिक शेतीमधील केलेले कार्य विषमुक्त अन्नधान्य, भाजीपाला पुरवठा बाबाजी बांगर करत आहेत. २००२ पासून नैसर्गिक शेती मार्फत त्यांच्या संपूर्ण शेतीमध्ये कसल्याच प्रकारचे केमिकल खते औषधे वापरत नाहीत. पूर्णतः निसर्गाच्या माध्यमातून ही शेती केली जाते. जसे की जीवामृत, घनजीवामृत, गोमूत्र, दशपर्णी अर्क, निमास्त्र, गूळ, ताक इ वापर केला जातो. आत्मा कृषी विभाग यांच्या माध्यमातून नैसर्गिक सेंद्रिय शेती, शेतकरी गट बांगर यांनी स्थापन केली आहे. बांगर यांच्या नैसर्गिक सेंद्रिय शेतीतील तसेच शेतकरी गटाचा शेतमाल काही ऑरगॅनिक कंपन्या यांच्या शेतावर येऊन सेंद्रिय भाजीपाला चांगल्या किमतीत शेतावरच खरेदी करत आहेत. या कामी बाबाजी बांगर यांना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्ती केल्याबद्दल बाबाजी बांगर यांनी शासनाचे आभार मानले. त्यांची नियुक्ती झाल्याने तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी बांगर यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे