समाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल पुर्वी खबरदारी घ्या, पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांचे आवाहन
1 min read
बेळगाव दि.२१:- बेळगाव शहरात विविध जाती धर्माचे लोक एकत्रितपणे शांततेत राहत आहेत.मात्र काही जण समाज माध्यमांच्या मधून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यामुळे समाज माध्यमांवर व्यक्त होताना खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी केले आहे. सामाजिक तेढ, भावना दुखावणे अथवा सामाजिक सलोखा बिघडेल अशा स्वरूपाची पोस्ट समाज माध्यमांवर करू नये. या स्वरूपाच्या पोस्टवर पोलिसांची बारीक नजर आहे. तसेच या विरोधात कडक कायदेशीर कारवाई त्वरित हाती घेतली जात आहे असेही याडा मार्टिन यांनी सांगितले आहे.
समाज माध्यमांवर वादग्रस्त पोस्ट टाकल्या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका संशयिताला रविवारी अटक करण्यात आली आहे. आणखीन दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतिबस्तवाड येथे धर्मग्रंथ जळल्याच्या घटनेनंतर वादाची ठिणगी पडली होती.
धर्मग्रंथ जळाल्याच्या आरोपावरून राणी चन्नमा चौकात नुकतेच आंदोलन झाले होते. या आंदोलनाचे व्हिडिओ आणि छायाचित्र एकाने समाज माध्यमावर अपलोड केले. यावर दुसऱ्याने वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्याने वाद अधिक चिघळला. या प्रकारामुळे समाजात तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून गुन्हा दाखल केला आहे.