वाढदिवसाचा खर्च टाळून आणे पठाराची भागवली तहान; युवा नेते पंकज कणसे यांचा स्तुत्य उपक्रम
1 min read
Oplus_131072
आणे दि.१६:- राजुरी येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक पंकज कणसे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आणे पठारावरील आणे, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा व वड्यावस्त्याना टँकरने पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. रविवार पासून पठारावर टँकर सुरु करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी देखील त्यांनी या भागाला ३ महिने टँकरने पाणी पुरवले होते. आणे येथील श्री रंगदास स्वामी महाराज मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या धर्म ध्वजासाठी पंकज कणसे यांनी वीस फूट रुंद व तीस फूट लांबीचा भगवा ध्वज श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान संस्थेला भेट दिला. त्यावेळी देवस्थान संस्थेच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते सागर लामखडे, निवृती गटकळ, निलेश कणसे, रवी गाडगे, रंगनाथ आहेर, किशोर आहेर, विनय दाते, देवस्थान संस्थेचे अध्यक्ष मधुकर दाते, डॉ. दीपक आहेर, अनिल आहेर, संजय दाते, रंगनाथ बेलकर, ज्ञानेश्वर दाते, शिंदेवाडीचे सरपंच लक्ष्मण शिंदे, सुहास नांगरे आदी मान्यवर उपस्थित होते.