विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
1 min read
मुंबई दि.१३:- भारतीय क्रिकेटला एका आठवड्यात दोन मोठे धक्के बसले आहेत. रोहित शर्मानंतर आता विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये अशी चर्चा होती की कोहलीने बीसीसीआयला त्याच्या निवृत्तीची माहिती दिली आहे. परंतु बीसीसीआयने त्याला आगामी इंग्लंड कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते.कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घालून मी 14 वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती.
या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर मला लक्षात राहतील असे धडे शिकवले. पांढऱ्या पोशाखात खेळणे हे नेहमीच्या माझ्यासाठी खास राहिले आहे. शांत खेळ, लांब दिवस, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात. मी या फॉरमॅटमधून बाहेर पडताना,
ते सोपे नाही – पण हा निर्णय मला बरोबर वाटतो. मी माझ्याकडे जे काही होते ते सर्व दिले आहे आणि या फॉर्मेटने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिले आहे. मी कृतज्ञतेने भरलेल्या हृदयाने इथून निघत आहे – खेळासाठी, मी ज्या लोकांसोबत खेळलो त्यांच्यासाठी आणि वाटेत मला दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमीच हसतमुखाने पाहतो.
ॲडलेडमध्ये खेळवण्यात आलेल्या डिसेंबर 2014 मध्ये सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पहिल्यांदाच दुखापतग्रस्त धोनीऐवजी कर्णधारपदाची सुत्र कोहलीच्या हाती दिली गेली. सामन्यात कोहलीनं पहिल्या डावात 115 धावा केल्या.
कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा भारतीय कर्णधार होता. दुसऱ्या डावात पाचव्या दिवशी भारतासमोर विजयासाठी 364 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आलं. भारताची धावसंख्या 2 गडी बाद 57 असताना कोहली फलंदाजीस आला आणि त्वेशानं फलंदाजी करू लागला.
त्याने मुरली विजयसोबत तिसऱ्या गड्यासाठी 185 धावांची भागीदारी केली. पण, त्यानंतर 242/2 अशा सुस्थितीतून भारताचा डाव 315 धावांवर आटोपला. 175 चेंडूत 141 धावा करून कोहली सामन्यातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्यावेळी कोहली म्हणालेला की, “संघानं सामना अनिर्णित ठेवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच प्रयत्न केलेले, मी सहभागी झालेली सर्वोत्तम कसोटी होती.