भारताकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; 9 दहशतवादी तळ केले उध्वस्त; मध्यरात्री आँपरेशन सिंदूर यशस्वी
1 min read
नवीदिल्ली दि.७:- भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूरअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने मिळून पाकिस्तान आणि पीओकेच्या ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राइक केला.
भारताने पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये असलेल्या लश्कर-ए-तोयबाचं हेडक्वार्टर नष्ट केलं आहे. पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील अनेक भागात क्षेपणास्त्रे डागली, यात एका मुलासह किमान आठ जणांचा मृत्यू झाला.
दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ही कारवाई केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून, भारताच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲापरेशन मॅानिटर करत होते. 9 टार्गेट ठेवण्यात आले होते. 9 च्या 9 टार्गेट यशस्वी झाले आहेत.
भारताने या एअरस्ट्राइकची माहिती देताना म्हटलंय, की दहशतवाद्यांनी वापरलेल्या पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यात आला आहे. लष्कर-ए-तैयबाचं दहशतवादी लपण्याचं ठिकाण मरकज-ए-तैयबा उडवून देण्यात आलं आहे.
भारताने हा हल्ला पीओकेच्या मुरीदके येथे केला आहे, जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. भारताने पाकिस्तान आणि पीओकेवरील ९ ठिकाणी एअरस्ट्राइक केला. बहावलपूर, मुरीदके, गुलपुर, भींबर, चक अमरू, बाघ, कोटली, सियालकोट आणि मुजफ्फराबाद अशा ९ ठिकाणांवर हल्ला केला.
मात्र भारतीय संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं की हे हल्ले केवळ दहशतवादी ठिकाणांवर केले असून पाकिस्तानी लष्करी तळांना कोणतंही नुकसान झालं नाही.
पाकिस्तानच्या निओ न्यूजच्या वृत्तानुसार, जैशचा प्रमुख दहशतवादी मसूद अझहरचे जन्मगाव असलेल्या बहावलपूरवर हल्ला झाला असून मसूद अझहरच्या मदरशावर चार गोळे पडले आहेत. त्यामुळे मदरसे जळत आहेत. पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. मोठ्या संख्येने सुरक्षा एजन्सी तिथे पोहोचल्या आहेत.
शहरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. मसूद अझहरचे चार मदरसे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. गेल्या महिन्यात भारताच्या ताब्यातील काश्मीरमध्ये पर्यटकांवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. त्यानंतर भारताने मंगळवारी मध्यरात्री कठोर कारवाई केली.