आला रे पाऊस आला, केरळमध्ये 1 जून रोजी दाखल होणार अन् महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार दाखल
1 min read
पुणे दि.५:- देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले होते. याचदरम्यान देशातील शेतकऱ्यांसह सर्वांसाठी आनंदाची बातमी येत आहे. केरळमध्ये मे च्या शेवटच्या आठवड्यात आगमन होईल. ऑक्टोबरच्या आसपास मान्सून राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी मान्सून 105 टक्के राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रात नियोजित वेळेपेक्षा एक आठवडा आधी मान्सून येणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे १५ मे च्या आसपास अंदमान निकोबारमध्ये मान्सूनचं आगमन होईल. मुंबईत 10-11 जूनच्या आसपास मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे.
दुसरीकडे मराठवाड्यात मात्र यंदा 80 टक्केच मान्सून राहील असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने दिला आहे. जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून येईल असा प्राथमिक अंदाज आहे. मागील वर्षीप्रमाणे, यंदाही मान्सून शेतकऱ्यांना सुखावण्याची शक्यता आहे.
मान्सूनवर एल निनो, ला निना किंवा हिंद महासागरातील द्विध्रुवीय घटकांचा परिणाम होणार नाही. त्यामुळे यंदाचा मान्सून नेहमीप्रमाणे सरासरी इतका आणि वेळेत दाखल होईल.