संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख बारावी परीक्षा उत्तीर्ण; मिळाले ८५.३३ टक्के गुण

1 min read

बीड दि.५:- बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख बारावी पास झाली आहे. तिला बारावीला ८५.३३ टक्के गुण मिळाले आहेत. वडिलांच्या हत्येनंतरच्या कठीण काळात वैभवीने चिकाटीने बारावीची परीक्षा दिली आणि तिला चांगले यश मिळाले. बारावीचा निकाल लागल्यानंतर संतोष देशमुखांची मुलगी खूपच भावुक झाली. निकालानंतर कौतुकाची थाप द्यायला आज माझे वडील नाहीत अशी खंत व्यक्त करताना वैभवी देशमुखच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशीच शिक्षा द्या अशी मागणी तिने यावेळी केली.आज बारावीचा निकाल लागला मला 85.33% गुण मिळाले आहेत. परंतु, माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत, अशा शब्दात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने आपल्या वडिलांची आठवण जागवली. 12 वीच्या निकालानंतर वैभवीचे महाराष्ट्र भरातून कौतुक होत आहे. मात्र, आज तिचं कौतुक करायला तिचे वडील नाहीत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे