मुंबई बॉम्बने उडवून देऊ; पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल

1 min read

मुंबई दि.१६:- मुंबई बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा फोन आला आहे, ज्यामध्ये फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख डी कंपनीतील सदस्य म्हणून करून दिली आहे.डी कंपनीचे नेतृत्व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम करतो. यामुळे एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतले आहे. फोन करणाऱ्याने मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा केला आहे आणि स्वतःला ‘डी कंपनी’चा सदस्य असल्याचे सांगितले आहे. धमकीच्या फोननंतर स्थानिक पोलिस तात्काळ सक्रिय झाले. आणि बॉम्ब पथकाला माहिती देण्यात आली. चौकशी करण्यात आली, पण काहीही संशयास्पद आढळले नाही. पोलिसांनी फोन करणाऱ्याचे ठिकाण शोधले आणि मुंबई गुन्हे शाखेने बोरिवली येथून फोन करणाऱ्याला ताब्यात घेतले. मंगळवारी पहाटे २:३० च्या सुमारास फोन आला. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता, ज्यामध्ये आरोपीने दावा केला होता की, “मी डी (दाऊद) टोळीचा आहे आणि मुंबईत बॉम्बस्फोट होतील.” यानंतर त्याने अचानक फोन डिस्कनेक्ट केला. कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या या कॉलनंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देण्यात आली, त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे