दशक्रिया विधीत असलेल्या घरी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

1 min read

नारायणगाव दि.८:- चोरटे सध्या दिवसा ढवळ्या चोरी करण्याचं धाडस करत असून चोरी करण्यासाठी नवीन शक्कल लढवत आहेत. दशक्रिया विधीसाठी लोक गेल्याचा फायदा घेत घरफोडी करून पैसे व सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराइताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे.

सदर आरोपीकडून ५ लाख ४६ हजार ४८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
या बाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,
जुन्नर गोळेगाव व निरगुडे (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत दशक्रिया विधी असलेल्या दोन घरांत चोरट्यांनी चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधार आकाश विभुते यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्यांची कबुली दिली तसेच तो कोणत्या गावात कोणाच्या घरी दशक्रिया आहे, याची माहिती घेऊन चोरी करीत असल्याचे सांगितले.

आकाश प्रकाश विभुते (वय ३२, रा.वारुळवाडी आनंदवाडी, ता. जुन्नर; मूळ रा. सुपली, पो. पळशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी त्याच्याकडून ५ लाख ४६ हजार ४८१ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस हवालदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, मंगेश थिगळे, राजू मोमीन, चंद्रकांत जाधव, संदीप वारे, पोलिस कॉन्स्टेबल अक्षय नवले, दगडू विरकर यांच्या पथकाने

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे